कोलकाता : ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात बांगलादेशची दाणादाण उडाली आहे. उमेश, ईशांत आणि शमी या त्रिकूटच्या भेदक मा-यासमोर बांगलादेशची उपाहारापर्यंत पहिल्या डावात २१ षटकांत ६ बाद ७३ अशी अवस्था झाली आहे.
India dominate the first session!
Their pacemen wreak havoc as Bangladesh are reduced to 73/6 at tea.
Can the visitors bounce back?
Follow #INDvBAN live 👇https://t.co/WIrstRq3Vm pic.twitter.com/xvT8aKoV7d
— ICC (@ICC) November 22, 2019
बांगलादेशच्या तीन फलंदाजाना तर भोपळाही फोडता आलेला नाही. कर्णधार मोमिनुल हक, मोहम्मद मिथून आणि मुशफिकुर रहीम शून्यावर बाद झाले. तर शदमन इस्लाम २९,महमूदुल्लाह ६ आणि इमरूल केस ४ धावांवर बाद झाले. लिटन दास २४ धावांवर असताना रिटायर्ड हर्ट झाला.
भारताकडून गोलंदाजीत उमेश यादवने सर्वाधिक ३ गडी बाद केले तर ईशांत शर्माने २ आणि मोहम्मद शमीने १ गडी बाद केला.