मुंबई – दसऱ्याच्या निमित्तानं आज (दि. १५) तब्बल दोन वर्षानंतर बीडमध्ये भगवान गडावर होणाऱ्या ‘दसरा मेळाव्याला’ भाजप नेत्या पंकजा मुंडे संबोधित करणार आहेत. या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
या मेळाव्यात पंकजा मुंढे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आजच्या दसरा मेळाव्याबद्दल बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “दरवर्षी दसरा मेळावा आगळावेगळा असतो.
हो… तुम्ही सांगायचे मी करायचे.
आपला दसरा आपली परंपरा !!#DasraMelava2021#BhagwanBhaktigad pic.twitter.com/IPkf1Dlhnh
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 12, 2021
हा मेळावा लोकांच्या आदेशावरून आणि आग्रहावरून होत असतो. यावेळचं स्वरूप किती सुंदर आणि देखणं आहे हे केवळ तिथे येणाऱ्या लोकांवर अवलंबून आहे. मला विश्वास आहे मेळावा आगळावेगळा असेल.”
तसंच या मेळाव्यासंदर्भातील एक व्हिडीओ सुद्धा पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. समर्थकांना भगवानगडावर दसरा मेळाव्यासाठी येण्याचं आवाहन त्यांनी या व्हिडिओतून केलं आहे.