खडकवासला – खडकवासला धरणाच्या अगदी लगतच्या डीआयऐटी नजिकच्या पूलाला धोका निर्माण झाला आहे. खडकवासला ते पानशेत रस्त्यावरील संरक्षण विभागाच्या डी आय टी जवळून जाणाऱ्या पानशेत रस्त्यावरील पुल व मख्य रस्ता पावसामुळे धोकादाय स्थितीत आला असुन,
रस्त्यावरील एका मोरी पुलाला तडे गेले असून पावसाचा जोर वाढल्यास हा रस्ता पूल खचण्याची भीती निर्माण झाली आहे. सहा ते सात महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पानशेत रस्त्याची व मोरी पुलाची पाहणी करूनही पुढे कोणतीच खबरदारीने न घेतल्याने पुलाच्या सुधारण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
त्यामुळे पाऊसात हा पूल व रस्ता खचतो की काय अशी भीती पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे .काल पासून या भागात जोरदार पाऊस पडत असल्याने पुलाचे कठडे तुटताना दिसु लागले आहेत.
त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून येथे अपघातसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. आज खडकवासला धरणातील पाणी सोडणार आसल्याने पर्यटकांची संख्या वाढणार आहे .त्वरीत या पुलाचे काम चालू करावे आशी मागणी अनिता इंगळे यांनी केली आहे .