पुणे – जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालय स्वच्छ, सुंदर व नीटनेटके करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार सर्व शासकीय कार्यालयात दि .31 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबवावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत.
याबाबत आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद आदी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. कदम म्हणाल्या, “कार्यालयातील वातावरण स्वच्छ असल्यास कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढून त्याचा प्रशासनास तसेच नागरिकांला लाभ होतो. पर्यायाने प्रशासन उत्तरदायी, सुलभ, पारदर्शी आणि गतिमान होण्यास मदत होते.’