“नंबरप्लेट’वर दादा, भाऊ, आप्पांना बसणार आळा

शासनाची अधिसूचना ः आता वाहन कंपन्याच बसवणार “हाय सिक्‍युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’

पिंपरी – मागच्या अनेक वर्षापासून दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर “दादा’, “मामा’, “भाऊ’, “काका’, “आप्पा’ अशा फॅशनेबल नंबर प्लेट पहायला मिळत आहेत. अधून-मधून अशा नंबरप्लेट असलेल्या वाहनधारकांवर कारवाईही करण्यात येते. पण त्याचा पुढे काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे, आता देशात एक युनिक नंबर प्लेट असावी, या करिता शासनाने अधिसूचना काढली आहे. त्यानुसार आता या महिन्याच्या सुरुवातीपासून गाड्यांना हाय सेक्‍युरेटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवली जाणार आहे. विशेष म्हणजे ही नंबर प्लेट वाहन उत्पादक कंपनीच बसवून देणार आहेत. बाहेर कोणालाही ही नंबर प्लेट तयार करता येणार नाही. त्यामुळे, आता वाहनांवर दिसणाऱ्या “फॅशनेबल नंबर प्लेट’वर आळा बसणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अनेक जण आपल्या गाड्यावर फॅशनेबल नंबरप्लेट लावत आहे. फॅशनेबल नंबर प्लेट लावण्याची सध्या फॅशनच बनली आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या समर्थकांमध्ये, तरुणांमध्ये ही फॅशन अधिक असते. काही प्रतिष्ठित व्यक्‍तीही अशा नंबर प्लेट लावून फिरण्यात अग्रेसर असतात. अशा नंबरप्लेटमुळे गाड्यांची चोरी झाल्यानंतर आधीच्या नंबरप्लेट काढुन तेथे दुसरी नंबरप्लेट बसवून त्या गाड्या चोरटेही वापरत होते. या सर्व गोष्टीला आळा घालण्यासाठी आता केंद्र सरकारनेच पाऊल उचचले आहे. त्यानुसार आता 1 एप्रिल पासून वाहन उत्पादक कंपनीच नंबरप्लेट बनवून देणार आहेत, यामुळे सर्व गाड्यांना एकसारखीच युनिक नंबरप्लेट असेल.

केंद्र सरकारने काढलेल्या अधिसुचनेनुसार आता नवीन विक्रीसाठी येणाऱ्या सर्व गाड्यांवर हाय सिक्‍युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट असणार आहे. ही प्लेट असल्याशिवाय त्या गाडीने रजिस्ट्रशन आरटीओ कार्यालयाकडून केले जाणार नाही. नवीन गाडी खरेदी केल्यानंतर डीलरच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयाने दिलेला नंबर वाहन उत्पादक कंपनीला कळवण्यात येणार आहे. त्यांनतर संबंधित कंपनीकडून हाय सेक्‍युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट तयार करुन ती गाडीवर बसवली जाणार आहे. त्यामुळे आता फॅशनेबल नंबरप्लेटला आळा बसणार आहे.

एक एप्रिल पासून निर्मिती झालेल्या गाड्यांना आता हाय सिक्‍युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असणे अनिवार्य असणार आहे. या नंबरप्लेटवर होलोग्राम स्टिकर्स असणार आहेत. ही नंबरप्लेट कोणालाही काढता येणार नाही. जर नंबरप्लेट काढण्याचा प्रयत्न केला तर ती तुटेल. तसेच बाहेर कुठेच अशी नंबरप्लेट बनवता येणार नाही. त्यामुळे आता गाड्यांची सुरक्षाही वाढणार आहे. तसेच फॅशनेबल नंबरप्लेटलाही आळा बसणार आहे.

– आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.