‘पीएम मोदी’ चित्रपट भक्तांसाठी नव्हे तर देशभक्तांसाठी बनवला – विवेक ओबरॉय

मुंबई – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ‘पीएम मोदी’ चित्रपट पाहिला तर त्यांना हा चित्रपट जरूर आवडेल. कारण ते देशभक्त आहेत, असे विवेक ओबरॉय याने म्हंटले आहे.

हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. परंतु लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित करू नये अशी मागणी काँग्रेसने केली होती. त्यानंतर याचीच पुनरावृत्ती घडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील लोकसभा निवडणुकीत चित्रपट प्रदर्शित झाल्यास आंदोलन करू अशी भूमिका घेतली होती.

या पार्श्वभूमीवर बोलताना विवेक ओबरॉयने, याच्या अगोदर देखील इतर राजकीय चित्रपटांना अनेकांनी पाठिंबा दिला होता. मग आताच विरोध का? असा सवाल उपस्थित केला. पुढे बोलताना मी हा सिनेमा कधी प्रदर्शित करू शकेल? हे कोणी सांगू शकेल का? ही तर हुकूमशाही आहे आणि आपण लोकशाहीत राहतो, असे म्हंटले आहे. चित्रपटाबाबत बोलताना विवेक ओबरॉयने हा चित्रपट भक्तांसाठी नव्हे तर देशभक्तांसाठी केला असल्याचे सांगितले.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.