#Prokabaddi2019 : ‘पोलादी’ हरयाणापुढे दिल्लीचे आव्हान

हरयाणा स्टीलर्स Vs दबंग दिल्ली
स्थळ – मुंबई
वेळ – रात्री 7-30 वा.

मुंबई – शारीरिकदृष्ट्या बलवान असलेल्या खेळाडूंचा समावेश असलेल्या हरयाणा स्टीलर्स संघास प्रो कबड्डी लीगमध्ये आज येथे तुल्यबळ दबंग दिल्लीच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. तर दुसरीकडे प्रो कबड्डी स्पर्धेत आज दुसऱ्या सामन्यात यु मुंबा समोर बंगळुरू बुल्सचे आव्हान असणार आहे.

दबंग दिल्ली :

बलस्थाने– सातत्यपूर्ण कामगिरी जिद्दीने झुंज देण्याबाबत ख्याती
कच्चे दुवे – पकडीबाबत नकळत होणाऱ्या चुका, चढायांवर नियंत्रणाचा अभाव

दिल्ली संघाने आतापर्यंत दोन्ही सामने जिंकले आहेत. तेलुगु टायटन्स व तमिळ थलाईवाज या संघांना हरविताना त्यांच्या खेळाडूंनी आत्मविश्‍वासाने खेळ केला आहे. मनोधैर्य उंचावलेल्या या संघास आजही चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीनेच नवीनकुमार याच्यावर त्यांची भिस्त आहे. त्याने थलाईवाजविरूद्ध आपल्या संघास सनसनाटी विजयश्री मिळवून दिली होती. त्याच्याबरोबरच जोगिंदरसिंग नरवाल, मिराज शेख व अमन काडियन यांच्याकडूनही त्यांना चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.

हरयाणा स्टीलर्स :

बलस्थाने– आत्मविश्‍वास उंचावलेले खेळाडू सांघिक समन्वय ही जमेची बाजू
कच्चे दुवे – चढाया करताना अक्षम्य चुका, बचावात्मक खेळावर नियंत्रण नाही

हरयाणाने पुणेरी पलटणवर शानदार विजय मिळवित झकास प्रारंभ केला आहे. या विजयामुळे त्यांच्या खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.