वाघोली- संततधार पावसामुळे मांजरी (ता. हवेली) येथील मुळा मुठा नदी दुथडी वाहत आहे. पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली असल्यामुळे पूल पाण्याखाली गेला आहे. पुलावरून पाणी वाहत असताना धोकादायकरित्या वाहतूक होत होती. धोकादायक वाहतुकीबद्दल स्थानिक नागरिक नाथाभाऊ उंद्रे, अशोक आव्हाळे यांनी महसूल यंत्रणेला कळविल्यानंतर पूल दुपारपासून बेरीकेडच्या मदतीने पोलिसांनी बंद केला आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पाणी उतरल्यानंतर पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात येईल.