World Cup 2023 Pakistan vs South Africa Match Live Updates : विश्वचषकाच्या 26व्या सामन्यात पाकिस्तानसमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ 46.4 षटकांत सर्वबाद 270 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 271 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, विजयासाठी 271 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या 16 षटकात 2 बाद 110 धावा झाल्या आहेत. आफ्रिकेला विजयासाठी 34 षटकात 161 धावांची आवश्यकता आहे. सध्या क्रीजवर रासी वन डर डुसेन 16*(30) आणि एडेन मार्करम 34*(25) धावांवर खेळत आहेत.
67 धावांवर दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का….
विजयासाठी 271 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने वेगवान सुरुवात केली. त्यांनी तीन षटकांत बिनबाद 34 धावा केल्या. मात्र, शाहीन आफ्रिदीने क्विंटन डी कॉकला बाद करून पाकिस्तानला पहिले यश मिळवून दिले. चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने डी कॉकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. षटकार मारण्याच्या प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीराने आपली विकेट गमावली. लेग साईडवर त्याला मोहम्मद वसीम ज्युनियरने बाऊंड्रीवर झेलबाद केले. डी कॉकने 14 चेंडूत 24 धावा केल्या.
67 धावांवर दक्षिण आफ्रिकेने दुसरी विकेट गमावली. क्विंटन डी कॉकनंतर टेंबा बावुमाही बाद झाला. बावुमाने 27 चेंडूत 28 धावा केल्या. मोहम्मद वसीम ज्युनियरने त्याला सौद शकीलकरवी झेलबाद केले.
Fluent half-centuries from @saudshak and @babarazam258 plus an important contribution from @76Shadabkhan sees Pakistan post 270 🏏#PAKvSA | #CWC23 | #DattKePakistani pic.twitter.com/9Zo3sgSC5C
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 27, 2023
तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघ पुन्हा एकदा पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेने त्यांना 46.4 षटकांत 270 धावांत गुंडाळले. पाकिस्तानकडून सौद शकीलने सर्वाधिक 52 आणि कर्णधार बाबर आझमने 50 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त शादाब खानने 43 आणि मोहम्मद रिझवानने 41 धावांचे योगदान दिले. तर मोहम्मद नवाजने 24, इफ्तिखार अहमदने 21 आणि इमाम उल हकने 12 धावा केल्या. अब्दुल्ला शफीक नऊ धावा करून, मोहम्मद वसीम ज्युनियर सात धावा करून आणि शाहीन आफ्रिदी दोन धावा करून बाद झाले. हरिस रौफ खाते न उघडता नाबाद राहिला.
चेन्नईच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून फिरकीपटू तबरेझ शम्सीने सर्वाधिक 4 बळी घेतले. यादरम्यान त्याने 10 षटकात 6 च्या इकॉनॉमीसह 60 धावा खर्च केल्या. याशिवाय मार्को यानसेनने 3 पाकिस्तानी फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कोएत्झीला 2 आणि लुंगी अँडिगीला 1 यश मिळाले.
दरम्यान, या विश्वचषकात पाकिस्तान संघाने पाचपैकी दोन सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत पाक संघ सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका पाचपैकी चार सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे.