Asian Para Games 2023 : आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये शीतल देवीने पुन्हा एकदा यश संपादन केले आहे. तिने हांगझोऊ येथे महिलांच्या वैयक्तिक कंपाउंड तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. शीतल, जी जगातील पहिली हात नसलेली महिला तिरंदाज देखील आहे. तिने सिंगापूरच्या अलीम नूर सयहिदाचा 144-142 असा पराभव करून अव्वल पारितोषिक जिंकले. यासह शुक्रवारी भारताचे पदकाचे खातेही उघडले.
दोन्ही हात नसतानाही छाती, दात आणि पाय यांच्या सहाय्याने धनुष्यबाण सोडणारी जम्मू-काश्मीरची तिरंदाज शीतल देवी हिने यापूर्वी राकेश कुमारसह पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या मिश्र कंपाउंड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. शीतलने बुधवारी रौप्यपदकही पटकावले होते.
Sheetal Devi Wins First 🥇 of the Day for 🇮🇳
🏹 The Phenomenal Archer delivers a scintillating performance, clinching the coveted GOLD in Women’s Individual Compound Open event, defeating Alim Nur Syahidah from Singapore in a breathtaking match!
🥇 Sheetal’s victory fills our… pic.twitter.com/dehBoXvbSZ
— SAI Media (@Media_SAI) October 27, 2023
भारताची आर्मलेस महिला तिरंदाज शीतल देवी हीने शुक्रवारी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. अशी कामगिरी करणारी शीतल भारताची एकमेव पॅरा महिला नेमबाज ठरली आहे. तिरंदाजी प्रकारात कंपाउंड गटात दोन सुवर्णपदके मिळवताना विक्रमही साकार केला. शुक्रवारीतीने वैयक्तिक गटात हे पदक पटकावले तर यापूर्वी सांघिक गटातही तीने सुवर्णपदकाला गवसणी घातली. तसेच तिने महिलांच्या दुहेरीत रजतपकदावर शिक्कामोर्तब केले.