World Cup 2023 India vs Sri Lanka Match Results : फलंदाज व गोलंदाजांनी केलेल्या अत्यंत अविश्वसनिय कामगिरीच्या जोरावर यजमान भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक 2023 स्पर्धेच्या 33 व्या सामन्यात गुरुवारी श्रीलंकेवर 302 धावांनी विक्रमी विजय मिळवला. हा भारताचा विश्वचषकातील सर्वात मोठा विजय आणि विश्वचषक इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय ठरला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमावून 357 धावा केल्या. भारताच्या या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि त्यांचे दोन्ही सलामीवीर पहिल्याच चेंडूवर बाद झाले.
श्रीलंकन संघाच्या विकेट्स पडण्याचा क्रम एवढ्यावरच थांबला नाही आणि अवघ्या 3 धावांच्या स्कोअरवर त्यांनी 4 विकेट गमावल्या. श्रीलंकेच्या या 3 धावांपैकी फक्त एक धाव बॅटने काढली आणि उरलेल्या 2 धावा अतिरिक्त ठरल्या. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात असे कधी घडले आहे, जेव्हा किमान धावसंख्येवर जास्त विकेट पडल्या असतील, याबदल जाणून घेऊया….
या यादीत पाकिस्तानचे नाव अग्रस्थानी आहे, ज्याने 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध केवळ 1 धावा करून 4 विकेट गमावल्या होत्या. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेच्या संघाचे नाव आले आहे, या संघाने (विश्वचषक 2023 स्पर्धा) 2023 मध्ये भारताविरुद्ध बॅटने केवळ एक धावा काढल्या होत्या आणि पहिल्या चार विकेट्स गमावल्या होत्या. या यादीत आयर्लंड तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ 2 धावा करून अव्वल चार विकेट गमावल्या होत्या.
#CWC23 #INDvSL : विश्वकरंडकात मोहम्मद शमीने रचले विक्रमांचे इमले…
या यादीत पाकिस्तान क्रिकेट संघाचे नाव पुन्हा एकदा चौथ्या क्रमांकावर आले आहे, ज्याने 1993 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध केवळ 3 धावा केल्यानंतर 4 विकेट गमावल्या होत्या. या व्यतिरिक्त, इंग्लंड संघाचे नाव या यादीत पाचव्या स्थानावर आहे, ज्याने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ 3 धावा करून 4 विकेट गमावल्या होत्या.