ICC ODI World Cup 2023 India vs Pakistan : विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत आतापर्यंत 10 सामने खेळले गेले आहेत. चाहते या स्पर्धेचा भरपूर आनंद घेत आहेत. स्पर्धेत सर्व चाहत्यांच्या नजरा 14 ऑक्टोबर रोजी होणार्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर खिळल्या आहेत. मात्र, आता वर्ल्डकपमध्येही डासांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शुभमन गिलला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी डेंग्यू झाला होता आणि तो आता बरा झाला आहे. त्याचवेळी, त्यांच्यानंतर आता एक दिग्गज भारतीय समालोचकही डेंग्यूने ग्रस्त आहेत. यामुळे 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यातील सामन्यात ते समालोचन करू शकणार नाही.
हर्षा भोगले डेंग्यूने ग्रस्त…
‘व्हॉइस ऑफ क्रिकेट’ म्हणून ओळखल्या जाणार्या समालोचक हर्षा भोगले यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांना डेंग्यू तापाने ग्रासले आहे. शनिवारी अहमदाबाद येथे कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 2023 विश्वचषक स्पर्धेच्या समालोचन बॉक्समध्ये आपण नसल्याचे भोगले यांनी स्पष्ट केले आहे.
भोगले यांनी सहनिवेदकांचे मानले आभार…
भोगले यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वरील त्यांच्या अधिकृत हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे . त्यांनी म्हटले आहे की, “मी विश्वचषक 2023च्या स्पर्धेतील दरम्यान भारत-पाकिस्तान सामन्याचा भाग होऊ शकणार नाही याबद्दल मी निराश आहे. कारण मलाही डेंग्यूचा त्रास झाला आहे, त्यामुळे मी खूप कमकुवत झालो आहे आणि माझी प्रतिकारशक्तीही कमी झाली आहे. मी भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यासाठी परत येण्याची आशा करतो. माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनी मला खूप मदत केली आहे. ज्यासाठी मला त्यांचेही आभार मानायचे आहेत.
I am disappointed at having to miss out on #IndiavsPak on the 14th. But I have dengue and the resultant weakness, and lowered immunity, will make it impossible. I am hoping to be back in time for the game on the 19th. My colleagues, and the broadcast crew, have been very helpful…
— Harsha Bhogle (@bhogleharsha) October 12, 2023
हर्षा भोगले १९ तारखेला परतणार…
समालोचन करण्यासाठीच्या पुनरागमनाबाबत भोगले म्हणाले की, पुण्यात 19 ऑक्टोबर रोजी होणार्या भारताच्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी मी समालोचनासाठी परत येईल अशी मला आशा आहे. ते म्हणाले, ‘मला 14 तारखेला होणारा भारत-पाकिस्तान सामना चुकवावा लागणार असल्याने मी निराश आहे, (World Cup 2023: Commentator Harsha Bhogle Down With Dengue, To Miss India vs Pakistan Clash) पण मला डेंग्यू झाला आहे आणि परिणामी कमकुवतपणा आणि प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे काम करणे कठीण होईल त्यामुळे मी सध्या विश्रांती घेत आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, मी 19 तारखेच्या सामन्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये परत येण्याची आशा करतो. माझे सहकारी आणि ब्रॉडकास्ट टीमने खूप मदत केली आणि मी भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या मध्येच कॉमेंट्री बॉक्समधून बाहेर पडल्यानंतर माझे काम हाती घेतले. मी त्यांचे वैयक्तिक आभार मानण्यास उत्सुक आहे.