World Cup 2023 India vs Afghanistan :- एकदिवसीय विश्वचषकाच्या नवव्या सामन्यात भारत आणि अफगाणिस्तानचे संघ आमनेसामने आले आहेत. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना चालू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारताने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला. कर्णधार रोहित शर्माने अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला वगळले. त्यांच्या जागी शार्दुल ठाकूरची निवड करण्यात आली. अश्विनला वगळण्यात आल्यानंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर संताप व्यक्त करत संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्यान, भारत विरुध्द अफगाणिस्तान हा सामना सध्या सुरू असून अफगाणिस्तानची फलंदाजी झाली आहे. कर्णधार हशमतुल्लाह शहीदी आणि अजमतुल्लाह ओमरजई यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने भारतीय संघासमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. त्यांनी 50 षटकात 8 गडी गमावताना 272 धावा केल्या.
स्टार स्पोर्ट्स ब्रॉडकास्टरशी बोलताना गावसकर म्हणाले की, “अशा परिस्थितीत अश्विनने काय चूक केली आहे याची मला माहिती नाही. शमीने 2019 च्या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती. हे पाहता इलेव्हनमध्ये मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीबद्दलही त्याने खेद व्यक्त केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही त्याला प्लेइंग-11मध्ये स्थान मिळाले नव्हते.
अश्विनला संघाबाहेर ठेवण्याची सवय : गावस्कर
गावसकर म्हणाले, “पुन्हा एकदा अश्विनला संघातून वगळण्यात आले आहे.” त्याने काय चूक केली हे मला माहीत नाही. त्याला संघाबाहेर ठेवण्याची सवय आहे,अस वाटतं. मला वाटले होते की ,शमीने 2019 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती, त्यामुळे त्याला संधी मिळेल.” पण रोहितचा काय प्लॅन आहे, हे मला आताच सांगता येणार नाही.
टॉसच्या वेळी रोहित शर्मा काय म्हणाला?
नाणेफेकीदरम्यान कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, आम्हाला लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. आम्ही काल संध्याकाळी दवाचे प्रमाण पाहिले. मला वाटत नाही की विकेट फार बदलेल. चांगली गोलंदाजी करणे आणि परत येऊन चांगली फलंदाजी करणे आवश्यक आहे. अश्विन या सामन्यात खेळत नाही. त्याच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. हा एक बदल वगळता भारताने प्लेईंग-11 मध्ये कोणताही बदल केला नाही.
दोन्ही संघाची Playing 11 खालीलप्रमाणे :-
भारत :- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान :- रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.