World Cup 2023 NZ vs SL Match Live Score : एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 41 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात आहे. हा सामना जिंकून किवी संघ उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत करू इच्छितो. त्याचबरोबर श्रीलंका येथे विजय मिळवून पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 46.4 षटकांत सर्वबाद 171 धावांवर आटोपला. कुसल परेराने सर्वाधिक 51 धावा केल्या. तिक्षीनाने नाबाद 38 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेला पराभूत करण्यात यश मिळवले तर त्याचे उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित होईल.
Sri Lanka sets a target of 172 for New Zealand. Let the defending begin! #SLvNZ #CWC23 #LankanLions pic.twitter.com/T0lJz5LV8l
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) November 9, 2023
पहिल्या डावात काय घडले?
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. तीन धावांच्या स्कोअरवर पहिली विकेट पडली. निशांकाला आपले खातेही उघडता आले नाही. सौदीने त्याला बाद केलं. यानंतर परेराने वेगाने धावा केल्या, पण दुसऱ्या टोकाला विकेट पडत राहिल्या. कर्णधार मेंडिस सहा धावा करून बाद झाला. समरविक्रमा एक धाव काढून बाद झाला तर चारिथ असलंकाने आठ धावा केल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात कुसल परेराही वैयक्तिक 51 धावांवर बाद झाला. पॉवरप्लेनंतर श्रीलंकेची धावसंख्या 5 बाद 74 अशी झाली होती.
यानंतर धावांचा वेग कमी झाला, पण विकेट पडत राहिल्या. अँजेलो मॅथ्यूज 16 धावा करून बाद झाला तर धनंजय डी सिल्वा 19 धावा करून बाद झाला. चमिका करुणारत्नेही सहा धावा करून तर दुष्मंथा चमीराने एक धाव काढून बाद झाला. अखेरच्या विकेटसाठी महिष तिक्षीनाने दिलशान मदुशंकासोबत 43 धावांची भागीदारी केली आणि संघाला लढाऊ धावसंख्येपर्यंत नेले.
न्यूझीलंडकडून गोलंदाजीत ट्रेंट बोल्टने 10 षटकात 37 धावा देताना सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.