World Cup 2023 NZ vs SL Match : न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने गुरुवारी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात कुसल मेंडिसला बाद करून एक मोठा विक्रम केला. न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात 50 बळी घेणारा सहावा गोलंदाज तर न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे.
एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
1. ग्लेन मैक्ग्रा (ऑस्ट्रेलिया) – 71
2. मुथैया मुरलीधरन (श्रीलंका) – 68
3. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) – 59
4. लसिथ मलिंगा (श्रीलंका) – 56
5. वसीम अकरम (पाकिस्तान) – 55
6. ट्रेंट बोल्ट (न्यूजीलैंड) – 52
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पूर्ण केले 600 बळी…
याशिवाय न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 बळी पूर्ण केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 बळी पूर्ण करणारा बोल्ट न्यूझीलंडचा तिसरा गोलंदाज ठरला आहे.
#CWC2023 #NZvSL : न्यूझीलंडचा श्रीलंकेवर विजय, उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम…
ट्रेंट बोल्टच्या आधी डॅनियल व्हिटोरी आणि टीम सौदीने न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 बळींचा टप्पा ओलांडला होता. टीम साऊदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 731 विकेट घेतल्या आहेत. डॅनियल व्हिटोरीने 705 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या होत्या. ट्रेंट बोल्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 601 विकेट घेतल्या आहेत.