पुणे – पॉर्ट टाईम नोकरीच्या अमिषाने अनोळखी मोबाईल नंबरद्वारे व्हॉट्सपऍपवर मेसेज करुन एका तरुणाची 1 लाख 62 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाली होती.
या प्रकरणात प्रकरणात नऊ जणांविरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये आशिष प्रल्हादराय जाजू (रा.कोंढवा) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी.गुल्हाने यांनी अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे.
त्याने ऍड. ओंकार प्रकाश फडतरे, ऍड. सिद्धार्थ संजय अग्रवाल यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणी 8 ऑक्टोबर 2023 रोजी चिंचवड पोलीस स्टेशन येथे एफआयआर नोंदविण्यात आलेली होती.
आरोपीचे नाव एफआयआर मध्ये नाही ,तसेच आरोपीने कोणताही फसवणुकीचा गुन्हा केलेला नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. उच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचे दाखले देत बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस पंचवीस हजाराच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला