#CWC2023 #INDvPAK : “पाठीराखे नव्हते त्यामुळे पराभव, हे सांगणेच हास्यास्पद” कनेरियाची अश्रफवर टीका…

लाहोर :– भारताविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाल्यावर मायदेशी परतलेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झका अश्रफ यांच्यावर माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दानीश कनेरिया याने टीका केली आहे. संघातील खेळाडूंची कामगिरी सुमार झाली. याची कारणे शोधण्यापेक्षा अश्रफ अन्य कोणती सबब देत दोष करत आहेत. त्यांनी आधी आपल्या संघाचे समिक्षण करावे, असा सल्ला दिला आहे.
पुढे कनेरियानं म्हटले आहे की, सामना भारतात होत असताना तो देखील परंपरागत प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध मग त्यावेळी घरचे चाहतेच मैदानात जास्त संख्येने उपस्थित राहणार. मग आपल्या संघाला पाठीराखे नव्हते त्यामुळे आमचा पराभव झाला हे सांगणेच हास्यास्पद आहे.
दरम्यान, झका अश्रफ यांनी भारतातून पाकमध्ये दाखल होताच त्यांनी मंडळाच्या सदस्यांबरोबर एक बैठक घेतली व भारतात आलेल्या अनुभवांचे कथन करत थेट आयसीसीकडे तक्रार केली आहे. पाकिस्तानचा भारताविरुद्धचा सामना अहमदाबादमध्ये खेळवला गेला, त्यात भारतीय संघाने विजय मिळवला व विश्वकरंडकाच्या इतिहासात पाककडून पराभूत न होण्याचा इतिहासही जपला. या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज महंमद रिझवानसह अन्य खेळाडूंना भारतीय पाठीराख्यांकडून झालेल्या शेरेबाजीला सामोरे जावे लागले. तसेच पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींना भारतीय दुतावासाने वेळेत व्हीसा दिला नाही त्यामुळे नरेंद्र मोदी स्टेडियमवर सगळे भारतीय संघाचेच पाठीराखे असल्याचे चित्र दिसले. त्यामुळे आमचा पराभव झाला असे झका अश्रफ यांनी म्हटलं आहे. त्यावरून दानीश कनेरिया याने झका अश्रफ यांच्यावर टीका केली आहे.
#CWC2023 #INDvPAK : पाकमध्ये दाखल होताच PCB चे अध्यक्ष अश्रफ यांचे रडगाणे, ICCकडे केली तक्रार…
विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. भारताने या स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत 191 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने 30.3 षटकांत 3 गडी गमावत 192 धावा करून सामना जिंकला. विशेष म्हणजे वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर सलग आठवा विजय ठरला.





