World Cup 2023 Australia vs Pakistan Match Live Score : विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 18 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर पाकिस्तानचे आव्हान आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. सलग दुसऱ्या विजयाकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष लागले आहे. गेल्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेचा पराभव केला होता. त्याचवेळी पाकिस्तानला भारताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे बाबर आझमचा संघ विजयी मार्गावर परतण्यास इच्छुक आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात उपकर्णधार शादाब खान खेळत नसल्याचे त्याने नाणेफेकीदरम्यान सांगितले. शादाबच्या जागी उसामा मीरला संधी देण्यात आली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने एकही बदल केलेला नाही.
दोन्ही सलामीवीरांनी झळकावली शतके…
पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी पाकिस्तानविरुद्ध आपापली शतके पूर्ण केली. वॉर्नरने 31व्या षटकात मोहम्मद नवाजच्या चेंडूवर एक धाव घेत आपले शतक पूर्ण केले तर मिचेल मार्शने पुढच्याच चेंडूवर चौकार मारून शतक झळकावले. वॉर्नरचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील 21 वे शतक आहे तर मार्शचे हे दुसरे शतक आहे.
Twin tons 💯💯
Australia in overdrive! #CWC23 pic.twitter.com/gUd2l1GFfP
— cricket.com.au (@cricketcomau) October 20, 2023
विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाकडून पहिल्यांदाच दोन्ही सलामीवीरांनी एकाच सामन्यात शतकी खेळी खेळली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ऑस्ट्रेलियाने 31.1 षटकात बिनबाद 214 धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर नाबाद 100*(86) आणि मिचेल मार्श नाबाद 101*(101) धावांवर खेळत आहेत. दोन्ही फलंदाज आरामात फलंदाजी करत आहेत तर पाकिस्तान मात्र सामन्यात पहिल्या विकेटच्या शोधात आहे.
AUS vs PAK : दोन्ही संघांचे Playing-11
पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिश (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 107 सामने झाले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियानं 69 तर पाकने 34 सामन्यात विजय मिळविला आहे. तर 3 सामने अनिर्णत आणि एका सामना टाय झाला आहे.50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ 10 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने सहा सामने जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत.