World Cup 2023 Australia vs Pakistan Match Live Score : विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 18 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर पाकिस्तानचे आव्हान आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. सलग दुसऱ्या विजयाकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष लागले आहे. गेल्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेचा पराभव केला होता. त्याचवेळी पाकिस्तानला भारताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे बाबर आझमचा संघ विजयी मार्गावर परतण्यास इच्छुक आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात उपकर्णधार शादाब खान खेळत नसल्याचे त्याने नाणेफेकीदरम्यान सांगितले. शादाबच्या जागी उसामा मीरला संधी देण्यात आली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने एकही बदल केलेला नाही.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ऑस्ट्रेलियाने 43.1 षटकात 4 बाद 330 धावा केल्या आहेत. सध्या क्रीजवर मार्कस स्टॉइनिस नाबाद 14*(14) आणि जोश इंग्लिश नाबाद 5*(3) धावांवर खेळत आहेत.
वॉर्नर पॅव्हेलियनमध्ये परतला….
डेव्हिड वॉर्नरचा डाव अखेर संपुष्टात आला. तो 163 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 43व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वॉर्नर हारिस रौफचा बळी ठरला. बदली क्षेत्ररक्षक शादाब खानने त्याचा झेल घेतला. 124 चेंडूत 163 धावा करून वॉर्नर बाद झाला. त्याने 14 चौकार आणि नऊ षटकार मारले.
When Warner tons up, he goes LARGE #CWC23 pic.twitter.com/0eoRA0TEF5
— cricket.com.au (@cricketcomau) October 20, 2023
स्मिथ अयशस्वी…
या सामन्यात अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथची बॅट चालली नाही. तो नऊ चेंडूत सात धावा करून बाद झाला. स्मिथला उसामा मीरने स्वत:च्या गोंलदाजीवर झेलबाद करत पव्हेलियनमध्ये पाठवले.
ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का
पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का बसला आहे. मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेलला बाद करून शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानसाठी पुनरागमन केले. त्याने 34व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मार्शला उसामा मीरकरवी झेलबाद केले. मार्शने 108 चेंडूत 121 धावा केल्या. यादरम्यान त्याने 10 चौकार आणि 9 षटकार मारले. त्याच्या पाठोपाठ फलंदाजीला आलेल्या ग्लेन मॅक्सवेलला तर खातेही उघडता आले नाही. षटकाच्या सहाव्या चेंडूवर मॅक्सवेलने त्याला कर्णधार बाबर आझमकरवी झेलबाद केले.
दोन्ही सलामीवीरांनी झळकावली शतके…
पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी पाकिस्तानविरुद्ध आपापली शतके पूर्ण केली. वॉर्नरने 31व्या षटकात मोहम्मद नवाजच्या चेंडूवर एक धाव घेत आपले शतक पूर्ण केले तर मिचेल मार्शने पुढच्याच चेंडूवर चौकार मारून शतक झळकावले. वॉर्नरचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील 21 वे शतक आहे तर मार्शचे हे दुसरे शतक आहे. विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाकडून पहिल्यांदाच दोन्ही सलामीवीरांनी एकाच सामन्यात शतकी खेळी खेळली आहे.
AUS vs PAK : दोन्ही संघांचे Playing-11
पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिश (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.