पुणे – पूर्वीचा राग धरून खून केलेल्या आरोपीला सर्वोच्च दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायायलयाचे न्यायमूर्ती ए.एस.बोपन्ना आणि एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने जामीन मंजुर केला आहे.
दीपक कोल्हे असे जामीन झालेल्याचे नाव आहे. त्याने ऍड. सुधांशू चौधरी, ऍड. सचिन झालटे – पाटिल आणि ऍड. सागर कवडे यांचे मार्फ़त सर्वोच्च न्यायालयात जामिनसाठी अर्ज दाखल केला होता.
पूर्वी झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून 7 ते 8 आरोपींनी जुलै 2020 मध्ये प्रेम लिंगदाळे याचा खून केला होता. या गुन्ह्यात कोल्हे तुरूंगात होता. मात्र, बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकुण न्यायालयाने त्याला जामीन मंजुर केला.