शिरूर -शिरूर शहरात करोनाव्हायरस संसर्ग होऊ नये यासाठी शहरासाठी दोन दिवसआड जनता कर्फ्यु लावण्यात येणार आहे, तर शिरूर तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटात रोटेशन पद्धतीने जनता कर्फ्यु लावण्यात येणार असल्याची माहिती शिरूरचे तहसीलदार नाशिक व शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.दिल्ली येथे मुस्लीम समाजाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या दोघाजणांची नावे शिरूर तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
करोनचा प्रादुर्भाव वाढू नये व वैद्यकीय सोयींचा आढावा घेण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी बैठक बोलावली होती या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.या बैठकीला आमदार अशोक पवार, तहसीलदार लैला शेख, सभागृह नेते प्रकाशभाऊ धारिवाल, मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते.
शिरूर शहरात करोनाविषाणु संसर्गजन्य आजाराचे प्रादुर्भाव थांबविण्याच्या पार्श्वभूमीवर शिरूर नगरपरिषदेच्या वतीने आज शहरात तिसऱ्यांदाजनता कर्फ्यू लावण्यात आला.
हा जनता कर्फ्यू शहरात सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत पाळण्यात आला. त्यास शिरुर शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यासाठी शिरूर शहरातील पोलिसांच्या वतीने शहरात येणारे सर्व रस्ते बंद करून नाकाबंदी करण्यात आली होती.
शहरात यापुढे आठवड्यात दोनदा जनता कर्फ्यू ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. शिरूर तालुक्यामध्ये आजपर्यंत 5231 जणांना होम क्वारंटाईन केले असून दिल्ली येथे गेलेल्या मुस्लीम समाजाच्या कार्यक्रमातील दोन जणांची नावे निष्पन्न झाली असून, त्यातील एकाला तपासणीसाठी पुण्यातील नायडू हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे, तर एकाची माहिती संशयास्पद असल्याचे शिरूर प्राथमिक रुग्ण रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय रोटेशनप्रमाणे कर्फ्यू करण्याचे ठरले असून, या नागरिकांना अन्नधान्य व इतर मदत पाहिजे असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. आमदार निधीतून तीन व्हेंटिलेटर, 100 पीपी किट, 1000 एन 95 मास्क देण्यात येणार आहेत. शिरूर तालुक्यातील उद्योगपती व व कंपनीचे मालक यांच्याकडूनही शिरूर तालुक्यासाठी मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. शिरूर तालुक्यातील जनतेला जी मदत लागेल ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले