पिंपरी – तोंडाला मास्क न लावता एक जण गर्दीतून बाहेर आल्याने पोलिसांनी त्याला हटकले. तोंडाला मास्क लाव आणि घरी जा, असे सांगितले. मात्र त्याने पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणला. ही घटना पिंपरी येथे घडली. अमित ओंकारनाथ यादव (वय 38, रा. महात्मा गांधीनगर, पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी जी. एस. परदेशी (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे. पिंपरी येथील डिलक्स चौक येथे सोमवारी (दि. 30) रात्री साडेदहा ते साडेअकराच्या दरम्यान गर्दी झाली होती. त्यावेळी आरोनीे तोंडाला मास्क लावला नव्हता. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला हटकले. तोंडाला मास्क लावा आणि घरी जा, असे सांगितले. यामुळे आरोपीने पोलिसांसोबतच हुज्जत घातली.