पुणे – १९७ वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेले चंदुकाका सराफ ज्वेल्स म्हणजे उत्कृष्ठता, नाविन्यता व वर्षानुवर्षे संपादित केलेला विश्वास याचे प्रतिक. यामुळेच चंदुकाका सराफ ज्वेल्स आज संपुर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो ग्राहकांचे विश्वासाचे नाव झालेले आहे. नवनिर्मिती हा तर चंदुकाका सराफ ज्वेल्स चा आत्मा आहे मग ती दागिन्यांमधील असो वा संगीतातील. याच उद्देशाने नवीन, होतकरू कलाकारांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी सी.एस. म्युझिक चंदुकाका सराफ ज्वेल्स कडून सादर होत आहे. सी.एस. म्युझिकच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना प्रतिष्ठीत व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे उद्गार प्रख्यात गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी काढले.
चंदुकाका सराफ ज्वेल्स कडून सी. एस. म्युझिकचा शुभारंभ भव्य नेत्रदीपक सोहळ्यात प्रख्यात गायक आणि संगीतकार श्री शंकर महादेवन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संगीतकार एहसान दुरानी, लॉय मेंडोन्सा, चंदुकाका सराफ ज्वेल्सचे संचालक सिध्दार्थ शहा, डॉ. सौ. अंकिता सिध्दार्थ शहा व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी शंकर महादेवन यांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
हिंदी, मराठी, गुजराती, संस्कृत, कन्नड आणि अन्य भाषेतील मूळ रचनांना नवीन कलाकारांच्या सी.एस. म्युझिकच्या माध्यमातून सादर करण्याचा हा अनोखा संकल्प असल्याचे सिध्दार्थ शहा यांनी सांगितले. सर्व प्रमुख ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर या रचना प्रसारित केल्या जाणार असून अनेक उत्तमोत्तम नवीन कलाकारांना वाव मिळेल. यावेळी या अल्बम मधील कलाकारांनी निवडक गाणी सादर केली.