Ram Mandir: रामललाच्या प्राण प्रतिष्ठापणेचा कार्यक्रम आता काही वेळातच सुरू होणार आहे. यासाठी बॉलीवूडच्या अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली आहे. बॉलीवूडसह क्रीडा क्षेत्रातील अनेकजण या सोहळ्याला उपस्थित राहिले आहे. यावेळी बॉलीवूडसह साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रटी देखील येथे उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले.
अमिताभ बच्चनसह अनेक बॉलीवूड कलाकार अयोध्येत दाखल
अभिनेत्री कंगना राणावत, रणदीप हुड्डा, पवन कल्याण, शंकर महादेवन, कतरीना कैफ, विकी कौशल, आलिया भट्ट, रणबीर कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. याशिवाय माधुरी दीक्षित, रजनीकांत, अनुपम खेर, शंकर महादेवन, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, कैलाश खेर, अनु मलिक, मधुर भांडारकर, सोनू निगम, विवेक ओबेरॉय, गजेंद्र चौहान, रणदीप हुड्डा हे सेलिब्रिटी अयोध्येमध्ये पोहचले आहेत. यावेळी कलाकारांनी खास लुक केल्याचे पाहायला मिळाले.
सेलिब्रिटींचा खास लुक
रणबीरने पांढरा कुर्ता आणि धोतर असा वेश परिधान केला. तर आलियाने आकाशी रंगाची साडी परिधान केली आहे. माधुरी दिक्षितचे सौंदर्य पिवळ्या साडीमध्ये अधिक खुलून दिसत आहे. अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला दोघंही उपस्थित राहीले आहेत. याशिवाय विकी कौशल आणि कॅटरीना कैफचाही खास लूक पाहायला मिळाला. कॅटरीनाने सोनेरी रंगाची साडी नेसली आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला दोघंही उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या लूकची चर्चा होत आहे.
क्रिडा क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती
अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी क्रीडा जगतातील अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे. यात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यासह क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, रवींद्र जडेजा, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, अनिल कुंबळे, रोहित शर्मा, फुलराणी सायना नेहवालसह अनेकांना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले. त्यातील विराट कोहली, रविंद्र जडेजा अयोध्येत दाखल झाला आहे. तरक्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर आज सकाळी मुंबईहून अयोध्येमध्ये दाखल झाला आहे.