नवी दिल्ली: भाजपचे मजबूत नेते म्हणून ते अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये अनेक खात्यांचे मंत्री असलेले यशवंत सिन्हा पूर्णपणे होळीच्या मूडमध्ये आहेत. काश्मीर फाइल्स चित्रपटावर सिन्हा यांनी उपहासात्मक विधान केलं आहे. ते आता ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) नेते आहेत.
चित्रपटावर झालेल्या गदारोळाचा समाचार घेत ते म्हणाले की, हा चित्रपट न पाहणाऱ्यांना संसदेत कायदा करून शिक्षा झाली पाहिजे. ‘द काश्मीर चित्रपट देशभर करमुक्त करून चालणार नाही. संसदेला याबाबत कायदा करावा लागेल. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं.
ट्विटमध्ये सिन्हा यांनी म्हटलं की, ‘काश्मीर फाइल्स संपूर्ण भारतात करमुक्त करणे पुरेसे नाही. संसदेने सर्व भारतीयांना हा चित्रपट पाहणे बंधनकारक करावे. चित्रपटावर टीका करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी, असा कायदा संसदेने करायला हवा, अशी टीका यशवंत यांनी केली.
त्यांनी लिहिले, ‘जे चित्रपट पाहू शकत नाहीत, त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली पाहिजे, तर टीका करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे.’