चिंबळी – पाच वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या जमिनीच्या 7/12 नोंदीसाठी लाच घेणाऱ्या तलाठी महिलेस पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. 16) रंगेहाथ पकडले. चाकणमधील आंबेठाण येथील तलाठी कार्यालयात “एसीबी’च्या पुणे विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
वर्षा मधूकर धामणे (वय 45) असे या तलाठ्याचे नाव आहे. खासगी व्यक्ती अकबर (पूर्ण नाव, पत्ता, उपलब्ध नाही) याच्यावरही चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय तक्रारदार हे यांनी सन 2017 मध्ये म्हाळुंगे गावच्या हद्दीत जमीन खरेदी केली. खरेदी केलेल्या जमिनीच्या सात-बारा नोंदीसाठी तलाठी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारत होते; मात्र तलाठी कार्यालयातून पैशांशिवाय नोंदीचे काम होत नव्हते.
तुम्हालाही कोणता अधिकारी कोणत्याही कामासाठी खर्च-पाणी (लाच) मागत असल्यास 1064 या क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.