पुणे( प्रतिनिधी) – समर्थ पोलीस ठाण्याच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान एका तडीपार गुन्हेगारास अटक केली. त्याच्यावर तडीपारीचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशांत उर्फ मटया शशीकांत कुचेकर (27, सध्या रा.अहमदनगर मुळ रा. राजेवाडी, नानापेठ, पुणे) असे अटक आरोपीने नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनांक 10 ऑगस्ट रोजी समर्थ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे स्वातंत्र दिनाच्या अनुषंगाने सराईत गुन्हेगार तसेच तडीपार आरोपी चेक करण्यासाठी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
तपास पथकातील पोलीस अंमलदार सुमित खुट्टे यांना खबर मिळाली की, समर्थ पोलीस स्टेशनचे हद्दीतील तडीपार गुन्हेगार मटया हा निशांत टॉकीज समोर, भवानी पेठ, पुणे येथे सार्वजनिक रोडवर थांबला आहे. त्यानूसार तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा लावून तडीपार मट्याला ताब्यात घेतले.
त्यास तडीपार काळात सदर ठिकाणी येण्याचे कारण विचारले असता त्याने कोणाची परवानगी घेतली नसलेबाबत सांगितले. त्याला दि. 20 डिसेंबर 2019 पासुन 2 वर्षाकरीता पुणे शहर आयुक्तालय व पुणे जिल्हयातुन तडिपार करण्यात आले होते. त्याने सदर तडीपार आदेशाचा भंग केलेने त्यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त प्रियंका नारनवरे सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कद यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस अंमलदार सुमित खुट्टे, विठ्ठल चोरमले, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुभाष मोरे, निलेश साबळे, सुनिल हासबे, नितीन घोसाळकर, श्याम सुर्यवंशी, मपोना वनिता गोरे यांच्या पथकाने केली आहे.