नवी दिल्ली – पुरस्कार समितीला पॅरालिंपिकमधील खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करायला वेळ मिळावा यासाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा या वेळी लांबणीवर पडणार आहे. असे क्रीडा मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी (29 ऑगस्ट) होणारा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा होतो.
यंदाचा पुरस्कारा या वर्षीपासून ध्यानचंद यांच्या नावाने दिला जाणार आहे. गेल्यावर्षीपर्यंत हा पुरस्कार माजी पंतप्रधान राजीव गांध यांच्या नावाने दिला जात होता.
पॅरालिंपिक स्पर्धा 24 ऑगस्ट ते 5सप्टेंबर दरम्यान टोकियोतच पार पडणार आहेत. पुरस्कार निवडीसाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनीच आम्हाला निर्णय घेण्यासाठी आणखी वेळ मागितला असल्याचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
ते म्हणाले,’पुरस्कार समितीची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे काम सुरू आहे. पण, पॅरालिंपिक अजून सुरू व्हायचे आहे. आम्हाला पॅरालिंपिक स्पर्धेतील विजेत्यांच्या नावाचाही विचार करायचा असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले.’ राष्ट्रीय युवा क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
मागील वर्षी कोरोनामुळे पहिल्यांदाच या पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन राष्ट्रपती भवनात न होता ऑनलाईन झालं होते. राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले आहे. या वर्षी देखिल राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण आभासीपद्धतीनेच होईल, असेही ते म्हणाले.
मागील वर्षी देण्यात आलेले पुरस्कार
पाच खेळाडू खेलरत्न तर 27 खेळाडू अर्जुन पुरस्काराचे मानकरी
- गेल्या वर्षी पाच खेळाडूंना सर्वोच्च क्रीडा पुरस्कार अर्थात राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित
- 27 जणांचा अर्जुन पुरस्काराने गौरव
- पैलवान विनेश फोगाट, टेबिल टेनिसपटू मनिका बत्रा, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल आणि पॅराऑलिम्पियन मरियाप्पन थांगावेलु हे खेलरत्न पुरस्काराने सन्मान
राष्ट्रीय पुरस्कारांसाठी देण्यात येणाऱ्या रोख रकमेत गेल्या वर्षीच वाढ
खेलरत्न पुरस्कारासाठी आता 25 लाख रुपयाचे पारितोषिक, गेल्यावर्षी पर्यंत या पुरस्कासाठी 7.5 लाख रुपये .
– अर्जुन, द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्काराची रक्कम 5 लाखावरून 15 लाख
– ध्यानंचद जीवनगौरव पुरस्कारासाठी देखील आता १० लाख रुपये