पुणे(प्रतिनिधी) – पश्चिम बंगाल येथे जाणाऱ्या मजुरांना आरक्षित तिकीट देण्याचे आमिष दाखवून पैसे घेणाऱ्या गुन्हेगारास गुन्हे शाखा दोनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भात पोलिसांनी माहिती देताना सांगितले. पश्चिम बंगालचे काही मजुर पुणे-हावडा(प.बंगाल) या श्रमिक एक्सप्रेसने मूळगावी जाणार होते. तर आरोपी दिनेश ब्रिजराज सिंग, (35 रा. पुणे स्टेशन समोर, पुण) याने जस्ट डायल वर लॉकडाउन काळात रेल्वे बाबत चौकशी करणाऱ्या काही अशिक्षित मजुरांचा गैरफायदा घेऊन त्यांना तिकीट मिळवून देतो, रिजरवेशन करून देतो असे फोनद्वारे आमिष दाखवून त्यांना स्टेशन परिसरात बोलावून घेतले होते. त्यांच्याकडून प्रत्येकी 1500-2000 रु घेऊन त्यांना स्टेशन बाहेर रंगेत उभे करून तिकीट न देता पळून जात होता.
आरोपी मजुरांची आर्थिक फसवणूक करीत असल्याची बातमी युनिट-2 चे पोलिस कर्मचारी मोहसीन शेख याना मिळाली, त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जयवंत जाधव,पोलिस उपनिरीक्षक शिंदे आणि कर्मचारी आम्रे,वगगु, पठाण, मोहसीन शेख, गोपाळ मदने, कादिर शेख या पथकाने दिनेश ब्रीजराज सिंग यास रेल्वे स्टेशन समोरून ताब्यात घेतले. त्याच्या तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच्याविरुद्ध IPC 420, 511, 188, COVID- महाराष्ट्र प्रतिबंधित का. कलम-11 अन्वये गुन्हा दाखल केला त्यास पुढील तपासकामी बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.