अनधिकृत नळजोडणी करुन पाणी चोरणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा

पिंपरी – महापालिकेचा रस्ता खोदून अनधिकृतपणे नळजोडणी घेत पाणी चोरी केल्याप्रकरणी सांगवी येथील दोघाजणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी, महापालिका सांगवी उपविभागाचे पाणीपुरवठा उपअभियंता सदाशिव बाबूराव पाटील (वय-52) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन, आरती सतीश कोळपकर (रा. स्वामी विवेकांनद नगर, सांगवी) व शैलेश एकांबरी बासुंदकर (रा. गणेशनगर, नवी सांगवी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी तसेच परिसरात असलेल्या अनधिकृत नळजोडणी कनेक्‍शनची पाहणी करीत असताना महापालिकेचे उपअभियंता सदाशिव पाटील यांना सांगवी येथे स्वामी विवेकानंद नगर येथे आरती कोळपकर यांनी महापालिकेचा रस्ता खोदून तसेच पाईप लाईनचे नुकसान करुन अनधिकृतपणे नळजोडणी कनेक्‍शन घेतले असल्याचे समोर आले. असाच प्रकार नवी सांगवी येथील गणेशनगरमध्येही शैलश बासुंदकर यांनीही केल्याचे आढळून आले. त्यानंतर, या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी अधिक तपास सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साळुंके करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.