नवी दिल्ली – गुरुग्राम येथील हरसरू गावात राहणाऱ्या महिलेने 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. नंतर त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून लाखो रुपये उकळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी महिलेस अटक करण्यात आली आहे.
एप्रिल महिन्यात या निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याची ओळख एका महिलेबरोबर झाली होती. त्यानंतर तिने एक दिवस त्याला फ्लॅटवर बोलावले. गुंगीचे औषध टाकलेले कोल्डड्रिंक त्याला पिण्यास दिले. तो बेशुद्धावस्थेत असताना तिने त्याच्याबरोबर अश्लील फोटो काढले. वृद्धाला शुद्ध आल्यावर तो घरी आला. त्यानंतर महिलेने त्याला फोन केला व त्याने तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा आरोप केला. बदनामी होईल अशी भीती वाटत असल्याने वृद्ध तिला पैसे देत होता. तिच्या मागण्या वाढू लागल्यानंतर त्याने पोलिसाकडे तक्रार दाखल केली.