दुचाकी विकण्याच्या बहाण्याने फसवणूक

पिंपरी – ओएलएक्‍स या साईटवरुन स्कूटी दुचाकी विकण्याच्या बहाण्याने तरुणीला 35 हजार रुपयांचा गंडा घातला. ही घटना शुक्रवार (दि.12 जुलै) हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी स्मिता कुमारी (वय 24, रा. इवॉन होम्स, हिंजवडी फेज 3) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, 9350058306, 7027251235 आणि 9772311766 या तीन मोबाईल नंबर धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी फिर्यादी स्मिता यांनी ओएलएक्‍स या ऑनलाईन सेकेंडहॅण्ड वस्तू विकणाऱ्या वेबसाईटवर एक दुचाकी पसंत केली. यावर त्यांनी त्या दुचाकी मालकाला तीन मोबाईल क्रमांकावर फोन केला. 35 हजार रुपयात दुचाकी घेण्याचे ठरले, त्यानुसार स्मिता यांनी ती रक्कम आरोपीच्या बॅंक खात्यात भरली. मात्र आरोपीने स्मिता यांना स्कूटी दिली नाहीच व पैसे देखील परत केले नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here