पिंपळे गुरव येथे अल्पवयीन मुलावर ब्लेडने वार

पिंपरी – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन एकाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या मानेवर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.2) रात्री सातच्या सुमारास पिंपळे गुरव येथील सुदर्शननगर गल्ली मध्ये घडली.

चेतन अनिल धोत्रे (वय 16, रा. धोत्रे चाळ, गणेशनगर, पिंपळे गुरव) असे ब्लेडचे वार होऊन जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, लल्या (पूर्ण नाव पत्ता समजू शकलेला नाही) या नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी चेतन हा रविवारी रात्री सातच्या सुमारास मित्राच्या दुचाकीवरुन सुदर्शनगर गल्ली येथून चालला होता. यावेळी तेथे उभा असलेल्या लल्या याने पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून चेतनच्या मानेवर ब्लेडने सपासप वार केले. या घटनेत चेतन जखमी झाला आहे. आरोपी लल्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक शेंडकर तपास करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)