सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तमिळनाडूत ड्रेस कोड

चेन्नई  – तमिळनाडू सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेस कोड जारी केला आहे. महिलांनी कामावर असताना साडी किंवा सलवार-कमीज परिधान करावे, असा नियम काढण्यात आला आहे. भारतीय परंपरा जपली जावी, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयावर सरकारी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवीन आदेशानुसार, महिलांनी कार्यालयात साडी, सलवार-कमीज किंवा चुडीदार दुपट्टा परिधान करू शकतात. तर पुरुष शर्ट-पॅंट किंवा पाश्‍चिमात्य कपडे परिधान करू शकतात. याशिवाय कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये इतर कोणत्याची प्रकारचे कपडे परिधान करण्यास परवानगी नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.