पिंपरी – बहिणीच्या लग्नात झालेले कर्ज फेडण्यासाठी तसेच चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आण म्हणून विवाहितेचा छळ केल्याची तसेच किरकोळ कारणावरुन शिवीगाळ करुन घराबाहेर काढल्याचा प्रकार चिखली येथे घडला.
याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन तिचा पती मिनीनाथ बबन डोरले, सासरा बबन श्रीपती डोरले (वय-65) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे 2008 साली आरोपीसोबत लग्न झाले आहे.
दरम्यान पतीने वेळोवेळी मारहाण केली. तसेच बहिणीचे लग्न झाल्यानंतर लग्नात झालेले कर्ज फेडण्यासाठी तसेच चारचाकी गाडी विकत घेण्यासाठी माहेरहून पैसे आण, म्हणून त्रास दिला. सासरे बबन यांनीही किरकोळ कारणावरुन शिवीगाळ करीत घराबाहेर काढले.