कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक

पिंपरी  – कर्ज देण्यासाठी स्कीम असल्याचे सांगून एक लाख 40 हजारांची एकाची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 1 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान घडला आहे. महेश दिलीप पवार (वय-39 रा. मोशी) यांनी फिर्याद दिली असून चार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नोकरदार असून आरोपींनी फोनद्वारे त्यांचा संपर्क केला. कर्ज देण्यासाठी एक विशेष स्कीम आहे, असे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन करत वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांना आईडीएफबी बॅंक (नवी दिल्ली), सिंडीकेट बॅंक, ओरिएन्टल बॅंक ऑफ कॉमर्स, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया या खात्यांवर 1 लाख 40 हजार 826 रुपये जमा करण्यास भाग पाडले. पैसे उकळून आरोपींनी कोणतेही कर्ज न देता फिर्यादी व त्यांचे सहकारी अरुण लकारे यांची फसवणूक केली. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.