पुणे (प्रतिनिधी) – महिलेचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याच्या धमकी देउन 2 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने हैदराबाद येथून अटक केली. हंसराज बाबु गायकवाड (वय 31, रा. हैदराबाद, मुळ सावरखेड, ता. नायगाव, नांदेड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी एका महिलेने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
फिर्यादी महिला आणि आरोपी हंसराज गायकवाड तीन वर्षांपूर्वी शेजारी राहायला होते. त्यांच्यात एकमेकांच्या ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर त्याने महिलेचे काही अश्लिल फोटो नकळत काढले होते. मागील एक महिन्यांपासून गायकवाड महिलेला 2 लाख रुपये दे, नाहीतर अश्लील फोटो नातेवाईकांसह मित्रांना पाठवितो, अशी धमकी देत होता.
या प्रकरणी पोलीस अंमलदार समीर पटेल हैद्राबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने हैदराबादमध्ये जाउन गायकवाडला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, संजय जाधव, अस्लम पठाण, किशोर वग्गु, समीर पटेल, मीतेश चोरमोले, निखील जाधव, उत्तम तारु, अरूणा शिंदे यांच्या पथकाने केली.