शिक्रापूर -दहिवडी (ता. शिरूर) येथे गावातील एकाने महिला घरात एकटी असताना घरामध्ये प्रवेश करून तिचा विनयभंग करून दमदाटी केली होती. याचा जाब विचारल्याच्या कारणातून तिघांनी महिलेला नातेवाइकांना मारहाण केली.
याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पांडुरंग उकले, महेश उकले, विकास उकले (सर्व रा. उकलेवस्ती, दहिवडी, ता. शिरूर) या बापलेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश डुकले व रविकिरण जाधव करीत आहेत.