बंगळुरू – बंगळुरूच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे संघ समोरा समोर आले असून बंगळुरूने पुन्हा एकदा नाणेफेक गमावल्याने त्यांना प्रथम फलंदाजी करावी लागणार असून पावसामुळे अद्याप सामना सुरू झालेला नाही.
बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामना सुरु होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावल्याने सामना काही वेळाने सुरु होण्याची शक्यता आहे.
🌧️🌧️🌧️#RCBvRR pic.twitter.com/ksHkwk6cQW
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2019
दरम्यान, सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या नशिबाने आजही त्याला नाणेफेकीत साथ दिली नाही. यंदाच्या आयपीएल मध्ये 13 पैकी 10 सामन्यात विराटला नाणेफेक जिंकता आलेला नाही.