IND vs SA 2nd ODI Live Score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज गॅरेब्रा येथील सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला 211 धावांत गुंडाळले. आवेश खानच्या रूपाने टीम इंडियाला 10 वा धक्का बसला. नऊ चेंडूंवर नऊ धावा करून तो धावबाद झाला. भारताचा डाव 46.2 षटकात सर्वबाद 211 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
Innings Break!#TeamIndia are all out for 211 runs in 46.2 overs.
Sai Sudharsan top scored with the bat with 62 runs.
Scorecard – https://t.co/p5r3iTdngR #SAvIND pic.twitter.com/0qQgPgnhgT
— BCCI (@BCCI) December 19, 2023
भारताकडून साई सुदर्शनने 83 चेंडूत सर्वाधिक 62 धावा केल्या. सुदर्शनने आपल्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार लगावला. कर्णधार केएल राहुलने 56 धावांची खेळी केली. राहुलने 64 चेंडूंच्या खेळीत सात चौकार लगावले. अर्शदीप सिंगने 18 धावा केल्या. रिंकू सिंगला पदार्पणाच्या वनडेत केवळ 17धावा करता आल्या. संजू सॅमसन 10 धावा करून बाद झाला तर टिळक वर्मा 10 धावा करून बाद झाला. आवेश खान नऊ, अक्षर पटेल सात, ऋतुराज गायकवाड चार आणि कुलदीप यादव एक धावा करून बाद झाला. मुकेश कुमारने नाबाद चार धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत नांद्रे बर्गरने तीन बळी घेतले. बुरेन हेंड्रिक्स आणि केशव महाराज यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. लिझाद विल्यमसन आणि एडन मार्कराम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.