चांद्रयान-३ ही मोहीम यशस्वी करून दाखवत इस्त्रोने मोठा इतिहास रचला आहे. देशभरात या क्षणाचा आनंद साजरा करण्यात आला. मात्र आता इस्त्रोच्या कोणत्याही मोहिमेच्या उड्डाणावेळी १०,९,८,७… असे काउंटडाऊन करणाऱ्या इस्त्रोच्या संशोधक एन. वलरमथी यांचे निधन झाले आहे. त्यामुळे इस्त्रोच्या मोहिमाच्या उड्डाणावेळी उलटी गिनती सुरु करणार आवाज कायमचा हरपला आहे.
१४ जुलै रोजी चांद्रयान3 प्रक्षेपणावेळी त्यांचे शेवटचे काउंटडाउन ऐकण्यास मिळाले. ते वलरमथी यांचे हे शेवटचे काउंटडाऊन ठरले. शनिवारी संध्याकाळी चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आदित्य एल १ वेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालविली.
The voice of Valarmathi Madam will not be there for the countdowns of future missions of ISRO from Sriharikotta. Chandrayan 3 was her final countdown announcement. An unexpected demise . Feel so sad.Pranams! pic.twitter.com/T9cMQkLU6J
— Dr. P V Venkitakrishnan (@DrPVVenkitakri1) September 3, 2023
ISRO चे माजी संचालक डॉ. पीव्ही वेंकीटाकृष्णन यांनी ट्वीटरवर त्यांच्या निधानाची माहिती दिली. “श्रीहरिकोट्टा येथून इस्रोच्या भविष्यातील मोहिमांच्या काउंटडाउनसाठी आता वलरमथी मॅडमचा आवाज ऐकू येणार नाही. चंद्रयान ३ ही त्यांची अंतिम काउंटडाउनची घोषणा होती. त्यांचे अनपेक्षित निधन झाले आहे. खूप वाईट वाटत आहे. प्रणाम!”, असे शास्त्रज्ञ डॉ वेंकीटाकृष्णन यांनी ‘एक्स’वर लिहिले आहे.