ISRO XPoSat Mission : सरत्या वर्षाला निरोप देऊन आज जगभरात नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. दरम्यान, भारतातही या नवीन वर्षाचे स्वागत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने दमदारपणे केली आहे. इस्रो (ISRO) ने आज वर्षातील पहिली अंतराळ मोहीम सुरू केली आहे. इस्रोने 1 जानेवारी रोजी म्हणजेच आज सकाळी 9.10 वाजता ‘क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह’ (एक्सपोसॅट) मिशनचे प्रक्षेपण केले. 2023 मध्ये चांद्रयान-3 मिशनद्वारे चंद्रावर पोहोचल्यानंतर आणि आदित्य एल-1 मिशनद्वारे सूर्याकडे झेप घेतल्यानंतर इस्रोने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अंतराळ क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे.
या महत्वकांक्षी योजनेविषयी सांगताना इस्रोने , “वर्षातील पहिली मोहीम आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आली. मिशनच्या प्रक्षेपणामुळे, कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात विशेष खगोलशास्त्र वेधशाळा (Specialized Astronomy Observatory) पाठवणारा भारत हा जगातील दुसरा देश बनला आहे. एक्सपोसॅट ही संशोधनासाठीची एक प्रकारची वेधशाळा आहे, जी अवकाशातील कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांबद्दल अधिक माहिती गोळा करेल.
#WATCH | PSLV-C58 XPoSat Mission launch | ISRO launches X-Ray Polarimeter Satellite (XPoSat) from the first launch-pad, SDSC-SHAR, Sriharikota in Andhra Pradesh.
(Source: ISRO) pic.twitter.com/ua96eSPIcJ
— ANI (@ANI) January 1, 2024
पृथ्वीच्या खालच्या कक्षेत उपग्रह स्थापित करण्यात येणार
अमेरिकन स्पेस एजन्सी NASA ने 2021 मध्ये ‘इमेजिंग एक्स-रे पोलरीमेट्री एक्सप्लोरर’ (IXPE) नावाची मोहीम सुरू केली. याद्वारे सध्या अंतराळातील कृष्णविवर आणि इतर गोष्टींचा अभ्यास केला जात आहे. पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकलद्वारे एक्सपोसॅट अवकाशात पाठवण्यात आले आहे. पीएसएलव्ही रॉकेटद्वारे एक्सोपासॅट उपग्रह अवकाशात पाठवण्यात आला आहे. हा उपग्रह पृथ्वीच्या कमी कक्षेत स्थापित केला जाईल, तेथून पृथ्वीचे अंतर 650 किमी आहे.
एक्सपोसॅट मिशनचा उद्देश काय आहे?
मिशनच्या व्हिजनबद्दल बोलताना, मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे खगोलभौतिकशास्त्रज्ञ डॉ. वरुण भालेराव यांनी, म्हणाले, NASA च्या 2021 च्या इमेजिंग एक्स-रे पोलरीमेट्री एक्सप्लोरर किंवा IXPE या मोहिमेनंतरचे हे दुसरे मिशन आहे. हे मिशन मृत तारे समजून घेण्याचा प्रयत्न करेल. एक्स-रे फोटॉन आणि ध्रुवीकरणाच्या मदतीने एक्सोसॅट कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांजवळील किरणोत्सर्गाचा अभ्यास करेल.
डॉ. वरुण भालेराव यांनी पुढे बोलताना सांगितले, “ब्लॅक होल ही ब्रह्मांडात अस्तित्वात असलेली वस्तू आहे ज्याची गुरुत्वाकर्षण शक्ती सर्वाधिक आहे, तर न्यूट्रॉन ताऱ्यांची घनता सर्वाधिक आहे. या मोहिमेद्वारे भारत ब्रह्माची सर्वात अनोखी रहस्ये उघड करण्याचा प्रयत्न करेल. एक्सपोसॅट व्यतिरिक्त, भारतीय अंतराळ संस्थेने POEM नावाचे मॉड्यूल देखील अवकाशात पाठवले आहे.