Chandrayaan-3 : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. यावेळी इस्रोने चंद्राभोवती फिरणाऱ्या प्रोपल्शन मॉड्यूलला पृथ्वीच्या कक्षेत परत बोलावले आहे. इस्रोने हा प्रयोग करून सिद्ध केले आहे की ते आपले अंतराळ यानही परत मागवू शकतात.
इस्रोने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे आणखी एका अनोख्या प्रयोगात चांद्रयान३ च्या प्रोपल्शन मॉड्यूलला चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत आणण्यात आले आहे. चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवीय प्रदेशाजवळ सॉफ्ट लँडिंग करून विक्रम आणि प्रग्यानवर उपकरणे वापरून प्रयोग करणे हे चांद्रयान-3 मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट होते. हे अंतराळयान १४ जुलै २०२३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले.
विक्रम लँडरने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर ऐतिहासिक लँडिंग केले आणि त्यानंतर प्रग्यानला लँड करण्यात आले. “चांद्रयान-3 मोहिमेची उद्दिष्टे पूर्णपणे साध्य झाली आहेत,” ISRO ने एका निवेदनात म्हटले आहे की, प्रोपल्शन मॉड्युलचे प्राथमिक उद्दिष्ट भूस्थिर हस्तांतरण कक्षापासून (GTO) चंद्राच्या अंतिम ध्रुवीय कक्षापर्यंत लँडर मॉड्यूल लाँच करणे आहे. गोलाकार कक्षेत पोहोचणे आणि लँडर वेगळे करणे. त्यासोबतच विभक्त झाल्यानंतर, पेलोड ‘स्पेक्ट्रो-पोलारिमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ’ देखील प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये कार्यरत होते.असे सांगण्यात आले आहे.
इस्रोने,”प्रोपल्शन मॉड्यूलच्या हयातीत सुमारे तीन महिने हा पेलोड ऑपरेट करण्याची सुरुवातीची योजना होती, परंतु चंद्राच्या कक्षेत एक महिन्याहून अधिक कार्य केल्यानंतर, प्रोपल्शन मॉड्यूलकडे 100 किलोपेक्षा जास्त इंधन उपलब्ध होते. भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी अतिरिक्त माहिती गोळा करण्यासाठी प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये उपलब्ध इंधन वापरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे इस्रोने म्हटले आहे. तसेच , सध्या, प्रोपल्शन मॉड्यूल पृथ्वीभोवती फिरत आहेत 22 नोव्हेंबर रोजी त्यांनी 1.54 लाख किलोमीटर उंचीवर पृथ्वीच्या चंद्राच्या कक्षेतील सर्वात जवळचा बिंदू पार केला.