नवी दिल्ली – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने वर्ष २०२३ मध्ये केलेली नेत्रदीपलक कामगिरी, चांद्रयाऩ३ चे यशस्वी साॅफ्ट लॅंडींग आणि आदित्य एल-१ योजनेचा आरंभ यामुळे भारतीय शास्त्रज्ञांनी कौतुकास्पद कार्य करत नागरिकांची मने जिंकली.
आता २०२३ हे वर्ष संपायला एक आठवडाच उरला आहे. यानंतर आपण २०१४ मध्ये प्रवेश करू. जिथे आपण आगामी सण साजरे करू, आपल्या खास क्षणांचा आनंद लुटू आणि त्याच बरोबर भारत अनेक नवीन यश संपादन करेल. त्याचप्रमाणे, २०२३ मध्ये भारताने इतरही अनेक यश मिळवले, ज्याचे जगभरातून कौतुक झाले. या संदर्भात, या वर्षी आपल्या शास्त्रज्ञांनी अशी कामगिरी केली आहे, जी प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद आहे.
खरं तर, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान-३ यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवून एक नवा इतिहास रचला आणि भारताला अभिमान वाटला. इस्रोने चंद्रावरील मिशन चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग केले आणि भारतावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. इस्रोने १४ जुलै रोजी सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान-३ प्रक्षेपित केले होते. यानंतर चांद्रयान३ ने एकूण प्रवासास ४२ दिवस घेतले. यानंतर, या वाहनाच्या लँडर मॉड्यूल विक्रमने२३ ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळीसहाच्या सुमारास चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील पृष्ठभागावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केले.
चांद्रयान-३ चे सॉफ्ट लँडिंग करून भारताने जगाला सांगितले की आपले शास्त्रज्ञ कोणापेक्षा कमी नाहीत. त्याचबरोबर चांद्रयान यशस्वीपणे उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने ही कामगिरी केली आहे. चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर सूर्याचा वेध घेणारे आदित्य एल१ हे यानही सूर्याच्या दिशेने सोडण्यात आले. या यानाकडूनही छायाचित्रे मिळण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय अंतराळात मानव पाठवण्यासाठी ‘गगनयान’ योजनेलाही गती देण्यात आली आहे.