जळगाव – जळगाव जिल्ह्यात करोना काळात औषधी व रूग्णालयातील साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे. खडसे यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना यासंदर्भात चौकशी करण्याची विनंती करून सुद्धा त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही. असेही खडसे म्हणाले.
एकनाथ खडसे भ्रष्टाचाराचा खुलासा करताना म्हणाले की, ‘या गैरव्यवहाराबाबत जळगावातील दिनेश भोळे व माधुरी अत्तरदे यांनी सत्र न्यायालय दावा दाखल करून कारवाईची मागणी केली होती. सत्र न्यायाधीश यांनी याबाबत निकाल देत पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक व अन्य अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले होते. शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी देखील चौकशीची मागणी केल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
या भ्रष्टाचाराबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे चौकशीची विनंती केली होती. जळगावातील दिनेश भोळे माधुरी अत्तरदे यांनी सत्र न्यायालयात धाव घेऊन चौकशीची मागणी केली होती यासंदर्भात सत्र न्यायाधीशांनी पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक व अन्य अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे.