पारगाव – दौंड तालुक्यातील पारगाव (सा. मा) गावात 100 या करोनाचे रुग्ण आहेत. त्यातील 40 ते 50 जण वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत आहेत, काहीजण होम क्वाराटाईन आहेत. काही बाधित मोकाट फिरत आहेत. त्यामुळे पुढील परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गावात मागील आठवड्यात प्रमुख गाव प्रमुखांची व गावस्तरीय कृती समितीची बैठक बोलावली होती. परंतु सर्वांनी त्याकडे पाठ फिरवल्याने निर्णय घ्यायचा कोणी, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
आरोग्य उपकेंद्रात 94 ऍक्टिव्ह रुग्णाची नोंद आहे. आताच परिस्थिती आटोक्यात आली नाही तर परिस्थती हाताबाहेर जाण्याची नाकारता येत नाही.
पारगावची लोकसंख्या 15 हजार आहे. येथील बाजारपेठेशी परिसरातील पाच ते सहा गावे कनेक्ट आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.
तहसीलदार संजय पाटील म्हणाले की, करोना नियंत्रणाबाबत योग्य ती कारवाई सुरू आहे. संबंधित अधिकारी यांना योग्य त्या सूचना करीत आहोत.
गटविकास अधिकारी अजिंक्य येळे म्हणाले की, ग्रामपंचायत, तलाठी, गावस्तरीय कृती समिती यांना याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचा सूचना दिल्या आहेत.
दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ म्हणाल्या की, दौड तालुक्यातील 16 गावे हॉटस्पॉट जाहीर झाली असून आरोग्य विभागाच्या वतीने पूर्ण गावाची तपासणीचे काम सुरू आहे.