मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे. करोना पॉझिटिव्ह असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी होम क्वारंटाईन झाले आहेत.
माहितीनुसार, प्रशासनासोबत जितेंद्र आव्हाड हेही आपला मतदारसंघ असलेल्या कळवा आणि मुंब्र्यात रस्त्यावर उतरून लॉकडाऊनच्या परिस्थितीचा वारंवार आढावा घेत होते. त्यावेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला करोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आव्हाड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारन्टाइन करून घेतलं आहे.
यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनाच पूर्वकाळजी म्हणून क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे. यामध्ये पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचाही समावेश आहे.