नवी दिल्ली – गेल्या काहीं दिवसांच्या तुलनेत देशातील कोविड केसेस मध्ये काल काहीं प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या 24 तासांत देशात आढळून आलेल्या नवीन कोविड रूग्णांची संख्या 44 हजार 230 इतकी आढळून आली आहे.
कोविड केसेस मध्ये लागोपाठ तिसऱ्या दिवशीही रूग्ण वाढ आढळून आली आहे. दरम्यानच्या काळात कोविडग्रस्त 555 रूग्ण दगावले आहेत. देशातील सक्रिय बाधितांची संख्या 4 लाख 5 हजार 155 इतकी आढळून आली आहे. एकूण रूग्णांच्या तुलनेत हे प्रमाण 1.28 इतके आहे.
करोनातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या आता 3 कोटी 7 लाख 43 हजार 792 इतकी झाली आहे. देशात कोविड प्रतिबंधक लस घेतलेल्या नागरीकांची संख्या 45 लाख 60 हजार इतकी झाली आहे.