अमरावती – आंध्रप्रदेशात आज पहाटे गुंटुर जिल्ह्यात शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सहा स्थलांतरीत मजुरांचा होरपळून मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. इलेक्ट्रीक शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असे गुंटुंरच्या पोलिस अधिक्षकांनी सांगितले.
या प्रकाराच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांची पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी प्राथमिक स्वरूपात जी माहिती घेतली त्यात संशयास्पद असे काही आढळून आलेले नाहीं त्यामुळे हे अपघातीच मृत्यू असल्याचे स्पष्ट होत आहे असे ते म्हणाले.
मत्स्यव्यवसायाशी संबंधीत एका केंद्रात हा प्रकार घडला. या केंद्राच्या दोन मालकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तेथील अन्य कर्मचाऱ्यांकडेही या प्रकाराची चौकशी करण्यात आली आहे.