हैदराबाद – तिरुपती हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. तरुपतीला पैसे, कपडे किंवा सोनं-चांदीच्या वस्तू दान करतात. मात्र एका उद्योगपतीने तिरुमलाच्या श्री वेंकटेश्वर स्वामी देवाला सोन्याची तलवार दान केली आहे. या दानाची सर्वत्र चर्चा होत आहे. हैदराबादमधील उद्योजक एम. एस. प्रसाद यांनी ही 5 किलोची तलवार देणगी स्वरूपात दिली आहे.
2 किलो सोने आणि 3 किलोची चांदीची ही तलवार आहे. तलवारीची किंमत जवळपास एक कोटी असल्याचे सांगितले जाते. या तलवारीला सूर्यकटारी म्हणतात अशी माहिती आहे. वेदिक परंपरेनुसार सूर्यकटारी हे तिरुमला पर्वतांमध्ये वास्तव्यास असलेल्या वेंकटेश्वराचे शस्त्र आहे असे मानले जाते. त्या वर्णनानुसारच ही तलवार तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सूर्य कटारीचा अर्थ सूर्यासारखी तळपणारी तलवार असा होतो. एक कोटीची ही सोन्याची कट्यार खूप आकर्षक आहे.